तहसीलदार कार्यालयात बैठक : राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात : अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव ; विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व निवडणूक काळात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. याचबरोबर निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यात येत आहे. यातच अधिकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान येणाऱ्या प्रशिक्षणाचेही धडे देण्यात येत आहेत. तहसीलदार कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनसंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तालुका पंचायत तसेच जिल्हा पंचायतचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सध्या निवडणूक आयोगाने अद्याप तरी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले नसले तरी अंतर्गत कामकाजांना जोरदार सुऊवात करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या व इतर सर्व तयारी करण्यावर सध्या जिल्हा प्रशासनाने जोर दिला आहे. राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होणार असून याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येत आहे. अचानक निवडणुका जाहीर झाल्यानंतर अधिकाऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी सर्व ती तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी तहसीलदार कार्यालयात व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची माहिती देण्यात आली.