प्रेयसीच्या मृत्यूनंतर दुःखासह जगभ्रमंतीची सुरुवात
सोबत असलेल्या श्वानाचा विश्वविक्रम
अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे राहणाऱया टॉम टर्किचने स्वतःच्या श्वानासोबत पायी प्रवास करत 38 देश ओलांडले आहेत. 7 वर्षांच्या प्रवासात टॉमसोबत गेलेला श्वान सवानाने विश्वविक्रम केला आहे. सुमारे 48 हजार किलोमीटरच्या प्रवासात टॉम टर्किचसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली, परंतु त्याने स्वतःचा प्रवास रोखला नाही. हा प्रवास 5 वर्षांमध्येच पूर्ण केला असता, परंतु कोरोना महामारी आणि स्वतःच्या आजारपणामुळे दोन वर्षे अधिक लागल्याचे टॉमने म्हटले आहे.
पायी प्रवासास निघण्यामागे टॉमची कहाणी देखील आहे. टॉमची प्रेयसी मेरीचा 2006 मध्ये एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या घटनेमुळे टॉम दुःखात बुडाला होता. जीवन छोटे असल्याचे वाटू लागल्याने त्याने जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. टॉमने निधी संकलनास सुरुवात केली. कॉलेजदरम्यान उन्हाळय़ाच्या सुटीदरम्यान काम करत टॉमने दोन वर्षांपर्यंत फिरण्यासाठी पैसे जमविले.
26 जन्मदिनी प्रवासास सुरुवात
2016 मध्ये टॉमने स्वतःच्या 26 व्या जन्मदिनी हा प्रवास सुरू केला. या प्रवासात अनेक उतारचढाव अनुभवले, तुर्किये-उझ्बेकिस्तानात लोकांनी विवाहसोहळय़ांमध्ये आमंत्रित करून त्यांच्या आनंदात सामील पेल्याचे टॉमने सांगितले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक न्यूमॅनच्या कहाणीने प्रेरित होत टॉमने जगभ्रमंतीचा निर्णय घेतला होता. टॉमच्या या प्रवासाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तांत्रिक कारणांमुळे स्थान मिळू शकलेले नाही. परंतु त्याचा श्वान इतका पायी प्रवास करणारा पहिला प्राणी ठरला आहे.
दररोज 40 किमी प्रवास टॉम आणि सवाना दररोज सुमारे 30-40 किलोमीटर पायपीट करायचे. बहुतांश रात्री कँपमध्येच घालवत होते. या प्रवासात सवानाने मोठी साथ दिली. त्याच्यात माझ्यापेक्षा अधिक ऊर्जा असायची, तसेच तो अत्यंत उत्साही वाटायचा. त्याच्या सोबतीमुळे सुरक्षाही वाटायची असे टॉमने म्हटले आहे.