कारची चारचाकी व दुचाकीला जोरदार धडक, अपघातात तिघे जखमी
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील बॉम्बे रेस्टाँरंट चौकात दोन चारचाकी गाडय़ा व एक दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आटपाडी गावचे पवार कुटुंबिय जखमी झाले आहे. तर दुचाकीस्वार यांची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस हवालदार कराळे यांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया चारचाकी गाडीने पुढे असलेल्या चारचाकी व दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत आटपाडी गावचे अमोल सावंत व त्यांची पत्नी, मुलगी जखमी झाले. त्यांना गाडीतून बाहेर काढून नागरिकांनी तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ते किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु दुचाकीस्वाराबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी त्यांची दुचाकी ताब्यात घेतली आहे.