पेडणे / प्रतिनिधी
मालपे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री महाराष्ट्रातून गोव्यात गुळ घेऊन येत असलेल्या ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटला. या अपघातात चालक कॅबिनमध्येच अडकला. पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घनास्थळी जाऊन अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला कॕबिनमधून बाहेर काढून त्याचे जीव वाचविले.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून गुळ घेवून एम.एच 03 सी.पी 4118 ट्रक पेडणे मार्गाने म्हापसा येथे जात असताना रात्रीच्यावेळी मालपे येथे उतरणीवर पोचला असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने वळणावर गाडी दुभाजाकावार चढवून नंतर डाव्या बाजूला उलटली आणि चालक गणेश जस्वाल (रा. मुंबई) या कॕबिनमध्ये अडकून पडला. ट्रक चालकाला पावर लिफ्टरचा वापर करुन पेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
यात फायर फायर स्टेशनचे सहाय्यक अधिकारी सुनील देसाई, लिडिंग फायर फायटर आसोलकर, विठ्ठल परब, ड्रायव्हर ऑपरेटर पी. गवंडी, फायर फायटर राजेश परब, सहदेव परब, श्याम आरोंदेकर, शेखर मयेकर, फायर फायटर सावळ आणि पालिकेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपाघातग्रस्त ट्रकममध्ये आठ टन गुळाच्या ढेप तसेच काचेच्या रिकाम्या बाटल्या मोठय़ा प्रमाणात होत्या. हे गुळ एका खासगी कंपनीत नेले जात होते अशी माहिती मिळाली. अपघातात जखमी झालेल्या चालकाला रात्री म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.