उद्यमबाग पोलिसांची कारवाई : सात दुचाकी जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
मोटारसायकली चोरणाऱ्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी हैदरअली मुस्लीमअली शेख (रा. पिरनवाडी), मोदीन ऊर्फ नदीम संशोदीन पोटेगार (रा. अमाननगर-न्यूगांधीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक रामण्णा बिरादार, उपनिरीक्षक आर. पी. कदम, आय. एस. पाटील, जे. एफ. हादिमनी, ए. बी. बिदनूर, एस. ए. करकी, आय. एम. चवलगी आदींनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन हिरो स्प्लेंडर, दोन अॅक्टिव्हा, एक डिओ, एक अॅक्सीस, यामाह एफझेड एक अशा एकूण सात दुचाकी जप्त केल्या असून त्यांची किंमत 1 लाख 85 हजार इतकी होते. जोडगोळीला अटक करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी अभिनंदन केले आहे.