हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग यांची शतके निष्फळ, न्यूझीलंडचा एका धावेने निसटता विजय
डबलिन / वृत्तसंस्था
पॉल स्टर्लिंग (120) व हॅरी टेक्टर (108) यांनी शानदार शतके झळकावल्यानंतरही आयर्लंडला न्यूझीलंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 360 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात आयर्लंडने 50 षटकात 9 बाद 359 धावांपर्यंत मजल मारली. या निकालासह न्यूझीलंडने 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः 50 षटकात 6 बाद 360 (मार्टिन गप्टील 126 चेंडूत 15 चौकार, 2 षटकारांसह 115, हेन्री निकोल्स 54 चेंडूत 79, ग्लेन फिलीप्स 47, फिन ऍलन 33. अवांतर 18. जोश लिटल 10 षटकात 2-84).
आयर्लंड ः 50 षटकात 9 बाद 359 (पॉल स्टर्लिंग 103 चेंडूत 14 चौकार, 5 षटकारांसह 120, हॅरी टेक्टर 106 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 108, अँडी मॅकब्राईन 20 चेंडूत 26. अवांतर 28. मॅट हेन्री 4-68, मिशेल सॅन्टनर 3-71).
जेव्हा 2 शतकेही विजय मिळवून देऊ शकली नाहीत!
फलंदाज / प्रतिस्पर्धी / धावा / टार्गेट / वर्ष
स्टर्लिंग 120-टेक्टर 108 / न्यूझीलंड / 9-359 / 361 / 2022
रुट 107-बटलर 103 / पाकिस्तान / 9-334 / 349 / 2019
अबिद 112-रिझवान 104 / ऑस्ट्रेलिया / 8-271 / 278 / 2019
धवन 126-कोहली 106 / ऑस्ट्रेलिया / 323 / 349 / 2016
कार्लिस्ले 109-एरविन 100 / भारत / 6-277 / 281 / 2004 अझहर 111ना.-जडेजा 119 / श्रीलंका / 7-300 / 303 / 1997