जत, प्रतिनिधी
जत शहरातील शिवाजी पेठ जवळील एकाची दोन चारचाकी वाहने अज्ञाताने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी (दि.२६) ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रात्री पोलिसांनी नगरपरिषदची अग्निशमन गाडी बोलवून ही आग विजवली.मात्र, दोन्ही गाड्या पूर्णपणे जाळून खाक झाल्या होत्या.याबाबत जत पोलिस ठाण्यात अविनाश मारुती सोनुले (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अविनाश सोनुले यांच्या मालकीच्या इनोव्हा क्रिस्टा (एम. एच. 22 ए. एम. ०९००) व स्वीफ्ट (एम एच.१०बी.ए. ५७९६) गाड्या त्यांच्या घरा शेजारी लावून होत्या. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता दोन्ही गाड्या पूर्ण पेट घेतल्या होत्या. यामध्ये सोनुले यांचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार बाबर हे करत आहेत.