दोन दुचाकी खाक, 12 लाखांची हानी
प्रतिनिधी/ मडगाव
कोलवा येथे दोन घरांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली. आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी सुमारे 12 ते 15 लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सौझा यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला कोलवा येथील झेव्हियर फर्नांडिस यांच्या घराजवळील एका दुचाकीने पेट घेतला.
वाऱयाच्या झोताबरोबर ही आग जवळच असलेल्या घराच्या लाकडाला लागली आणि त्या घराला आगीने वेढा घातला. जवळच असलेल्या दुसऱया घरालाही आगीने घेरले.
दोन्ही घरातील सामान या आगीत खाक झाले. एकूण दोन दुचाकी या आगीत जळाल्या तर दोन्ही घरातील किमती सामानाची हानी झाली. सुमारे 12 ते 15 लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे.