तासगाव : प्रतिनिधी
तासगाव शहरांमध्ये नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे चेन हिसका मारून चोरून नेल्याच्या फिर्यादी दाखल झाल्या होत्या. तासगावच्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांच्या पथकाने याप्रकरणी आरोपी सुनील राजू खुडे, (वय 19 वर्ष), राहणार नाथनगर पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर व राम बबन मासाळकर, (वय 22 वर्ष), राहणार विजयनगर पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या दोन आरोपींना अटक करून त्यांनी लोकांच्या गळ्यातील हिसका मारून नेलेल्या सोन्याच्या चेन जप्त केल्या असून, दोघा चोरट्याकडून एकूण 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.