रायगड प्रतिनिधी
शुक्रवारी रात्री रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोहोत येथे शुल्लक कारणाच्या वादावरून एका इसमाने फायरिंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोन जण गंभीर व्यक्ती झाले आहेत.
महाड तालुक्यातील भीवघर या गावातील सोहम आत्माराम हिरडेकरह (२३) वर्ष व संकेश शशिकांत कदम (२८ ) अशी जखमी झालेले दोघांची नावे असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरता त्वरित दाखल करण्यात आले आहे.यातील एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला अधिक उपचार करता मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रोशन राम मोरे रा. मोहोत पाटीलवाडी तालुका महाड, असे फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून पोलिसांनी बंदूक देखील हस्तगत केली आहे.
महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करत आहेत.