प्रतिनिधी /पर्वरी
विजय शांताराम दळवी यांची साल्वादोर दी मुंद पंचायत सरपंचपदी आज बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच आग्नेलो फर्ना?डिस यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर हे पद रिकामे होते. त्यानंतर उपसरपंच रीना फर्ना?डिस यांच्याकडे तात्पुरता काहीकाळ सरपंचपदाचा ताबा होता. आज पंचायत कार्यालयात निवडणूक झाली असता दळवी त्याची बिनविरोध निवड झाली. गटविकास कार्यालयातील खुशाली हळर्णकर यांनी निरीक्षकाचे काम पहिले. तर सचिव सतीश गावस यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच दळवी यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सहकार्याने अनेक विकास कामे राबविणार आहे.यावेळी रीना फर्ना?डिस, संदीप साळगावकर,हेमंत बांदेकर,सुवर्णालता पार्सेकर तसेच अनुज हरमलकर उपस्थित होते.