सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील कास रस्त्यावरील अवैध बांधकाम केल्याप्रकरणी आधीच्या तहसिलदार आशा होळकर यांनी हॉटेल धारकांना नोटिसा बजवल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांची उचल बांगडी करण्यात आली अशी शहरात चर्चा आहे. नवीन नियुक्त झालेल्या राजेश जाधव यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतली आहे. पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कास रस्त्यावरील अवैध बांधकामे यांच्यावर कारवाई होणार याची सर्वत्र चर्चा होती. परंतु अचानक जुन्या तहसिलदारांची उचल बांगडी करण्यात आल्यामुळे हॉटेल मालकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. तसेच कास रस्त्यावरील हॉटेल बांधकामे ह्यांची माहिती अधिकारी सुशांत मोरे यांनी ईडीकडे तक्रार करणार आहेत. त्यांच्या बांधकामांना परवानगीच मिळू शकत नाही, तसेच काही अधिकाऱ्यावर देखील सुशांत मोरे यांनी आरोप केले आहेत.यासर्व गोष्टींमधे नविन नियुक्त झालेले तहसीलदार यांची खरी परीक्षा असेल हे निश्चित.
आज सकाळीच चार्ज घेतला आहे, अजून कारवाई संबंधित फाईल पाहिलेली नाही. कोणत्या प्रकारची कारवाईची नोटीस बजावण्यात आल्या आहेत हे पाहून घेतो. परंतु कायद्याच्या अंतर्गत ज्या गोष्टी येतील त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येईल.
राजेश जाधव- तहसिलदार