प्रतिनिधी /पणजी
रेवोडा बार्देश येथील श्री वेताळ देवस्थानच्या अध्यक्षपदी वल्लभ जयराम फडते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी देवस्थान समिती निवडण्यासाठी महाजनांची सर्वसाधारण सभा श्री वेताळ देवस्थान सभामंडपात झाली. निरीक्षक म्हणून बार्देश मामलेदार कार्यालयातील अधिकारी महेश सामंत उपस्थित होते. बिनविरोध निवडण्यात आलेली नूतन समिती पुढीलप्रमाणे ः
अध्यक्ष : वल्लभ फडते, उपाध्यक्ष : नारायण फडते, सचिव : शामसूर्या फडते, उपसचिव : गोवर्धन फडते, खजिनदार : गोकुळदास फडते, उपखजिनदार : रोहित फडते, मुखत्यार : प्रमोद फडते, उपमुखत्यार : राजेंद्र फडते.