प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी पालिका मंडळाच्या झालेल्या विशेष बैठकीत सत्ताधारी गटाचे नगरसेवक विराज फडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाचे उमेदवार नगरसेवक आनंद भाईडकर यांनी आपली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतल्याने निर्वाचन अधिकाऱ्यांनी विराज फ्ढडके यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी राजीनामा सादर केल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी विराज फडके आणि आनंद भाईडकर यांनी अर्ज दाखल केले होते.
म्हापसा पालिकेची आर्थिक स्थिती कधी सुधारता येईल, म्हापसावासियांची कामे त्वरित कशी करता येतील याकडे लक्ष देण्यात येईल, म्हापशातील विकासकामे कशी होतात यावर आपली खुर्ची अवलंबून आहे, असे उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी सांगितले.
गुप्त मतदान गरजेचे : डॉ. शशांक नार्वेकर
यापूर्वी आम्ही वायंगणकर व बेनकर यांना पाEिठबा दिला. मात्र त्यांची संगीत खुर्ची त्यांना यशाला आली नाही. पाच वर्षाची मुदत ते पूर्ण करू शकले नाहीत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नवीन आहेत त्यांना शिकण्यास थोडा वेळ जाईल. त्यांना आपण शुभेच्छा देतो. निवडणुकीत हात वरकरून मते द्या यावर नाईलाजाने हात वर करावे लागतात. जगात आता कुठेच हात उंचावून मतदान होत नाही. मतदार मत घालायला घाबरतात म्हणून हे बंद व्हायला पाहिजे. भाजप सरकार धमकी देऊन मते घेतात. उमेदवार निवडीसाठी गुप्त पध्दतीने मतदान होणे गरजेचे आहे, असे मत अॅङ शशांक नार्वेकर यांनी व्यक्त केले.
घाबरून मतदान होणार नव्हते: आनंद भाईडकर
म्हापसा पालिकेत आपण सिनिअर नगरसेवक असून म्हापसा शहराचा विकास साधण्यासाठी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र आपल्यास तसा पाठिंबा मिळणार नाही हे समजल्यावर आपण अर्ज मागे घेतला. कारण हात वर करून मतदान करण्यास सर्वच पाठिंबा देणे कठीण होते. मतदान गुप्त असायला पाहिजे कारण घाबरून मतदान करायला कोण पुढे येणार नव्हते हे समजल्यावर आपण अर्ज मागे घेतला, असे नगरसेवक आनंद भाईडकर यांनी सांगितले. नगरसेवक कमल डिसोझा, प्रकाश भिवशेट, तारक आरोलकर, सुधीर कांदोळकर, चंद्रशेखर बेनकर यांनी उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या