वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला आयपीएल शिस्तपालन नियमांचा भंग केल्याबद्दल त्याला सामना मानधनातील 10 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.
त्याला कोणत्या घटनेसाठी दंड करण्यात आला हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी सोमवारी येथे झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना कोहलीकडून मैदानात बेशिस्त वर्तनाचे दर्शन घडले. चेन्नई संघातील शिवम दुबे पार्नेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावर कोहलीने आनंद साजरा करताना अतिरेक केल्याचे दिसून आले. यासाठी त्याच्यावर ही कारवाई झाली असावी. चेन्नई संघाने हा सामना 8 धावांनी जिंकला होता. आता रॉयल चॅलँजर्स बेंगळूरचा या स्पर्धेतील पुढील सामना 20 एप्रिलला मोहालीत पंजाब किंग्स बरोबर होणार आहे.