विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या कळसारोहण सोहळय़ाला प्रारंभ : मिरवणुकीत महिलांचा सहभाग : 4 दिवस आध्यात्मिक कार्यक्रम
वार्ताहर /किणये
सोनोलीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या काळसारोहण सोहळय़ाला सोमवारपासून उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाले. सोमवारी गावात कळस मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत सोमवारी दिवसभर विठूनामाचा गजर झाला. य् ाा सोहळय़ानिमित्त चार दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी गणेश मंदिरापासून कळस मिरवणुकीला सुरुवात केली. गणेश पूजन लक्ष्मण झंगरूचे, विना पूजन परशराम कडोलकर, तुळस पूजन रमेश पाटील यांच्या हस्ते केले. दिंडीचे उद्घाटन रामू झंगाचे, मंडप उद्घाटन परशराम झंगाचे यांनी केले. मिरवणुकीसाठी संतोष पाटील यांनी ट्रक्टर दिले होते. तुकाराम पाटील व सातेरी कडोलकर यांच्या हस्ते पूजा केली. सजवलेल्या ट्रक्टरमधून विठ्ठल-रखुमाई मंदिराचा कळस तसेच ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करत होते. गावाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. सोमवारी सायंकाळी परशराम कनगुटकर महाराज सोनोली यांचे प्रवचन झाले. रात्री पांडुरंग उपलानी महाराज अवचितवाडी यांचे कीर्तन निरूपण झाले. पुढील तीन दिवस रोज पहाटे काकडारती, नित्य पूजा, ध्वजवंदन, अभिषेक होमहवन, दुपारी हरिपाठ, सायंकाळी 5 वा. प्रवचन, रात्री 8 वा.कीर्तन निरूपण आहे. दि. 21 रोजी सकाळी गावातील देवतांची पूजा, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना अभिषेक होमयज्ञ करण्यात येणार आहे. प्रवचन बाळू भक्तीकर व कीर्तन भाऊसाहेब पाटील महाराज शकीनहोसुर यांचे होणार आहे.
उद्या कळसारोहण
22 रोजी सकाळी 11 ते दुपारी बारापर्यंत इस्कॉन बेळगाव येथील शंकराअण्णा प्रभुजी ब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते कळसारोहण होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते कळस पूजन, तुकाराम महाराज मूर्तीचे पूजन व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी सातेरी पाटील सोनोली यांचे प्रवचन तर डॉ. शिवाजी पन्हाळे उत्तूर यांचे कीर्तन निरूपण आहे. 23 रोजी अश्वां रिंगण सोहळा 23 रोजी ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत कोगनोळी येथील हभप पूर्णानंद काजवे महाराज यांचे कालाकीर्तन, सकाळी 11 ते 1 पर्यंत माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा आहे. दुपारी महाप्रसाद आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे कळविले आहे.