बेळगाव : दड्डी क्रॉस (ता. हुक्केरी) जवळ सोमवारी चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तपासनाके उभारण्यात आले आहेत. यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक आर. के. गवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दड्डी क्रॉसवरील चेकपोस्टमध्ये एमएच 12 जेसी 6440 क्रमांकाची इंडिका विस्टा कार अडवून तपासणी केली असता या कारमध्ये बेकायदा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी गोवा बनावटीची वेगवेगळ्या कंपन्यांची 107 लिटर दारू जप्त केली आहे. कारसह त्याची किंमत 2 लाख 41 हजार 100 रुपये इतकी होते. बॉक्समध्ये प्रत्येकी 250 मिलीच्या बाटल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची चौकशी करण्यात येत आहे.
Previous Articleसोनोलीत घुमला विठूनामाचा गजर
Next Article वक्फ बोर्ड कायदा रद्द करा!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.