नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रात 5-जी सेवेसाठी रिलायन्स व भारती एअरटेल यांनी पुढाकार घेतलेला असला तरी व्होडाफोन आयडिया मात्र या व्यवहारात अडचणींना सामोरी जाते आहे, अशी माहिती मिळते आहे. 5-जी सेवेबाबतच्या कराराबाबत व्होडाफोनच्या हालचाली मंदावल्या आहेत. 5-जी शी संबंधित सुटेभाग साहित्याची रक्कम व टॉवरसंबंधीचे देणे देण्याची मागणी करण्यात आल्याने व्होडाफोनपुढच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. आगाऊ रक्कम घेऊनच नवा व्यवहार करणार असल्याचे संबंधितांनी व्होडाफोनला कळवले आहे.
नोकियाचे 3000 कोटी व इरिक्सनचे 1000 कोटी व्होडाफोनने द्यावयाचे आहेत. नुकसानीत असलेल्या व्होडाफोनने आपल्या 5-जी सेवेला लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीने विचार चालवल्याचे बोलले जात आहे. यातून कंपनीचे ग्राहक आगामी काळात कमी होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.