वार्ताहर /कुडाळ
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित कोल्हापूर विभागीय 19 वर्षाखालील शालेय व्हाॅलीबॉल स्पर्धा एस.एल. देसाई विद्यालय पाट हायस्कूलच्या मैदानावर झाली. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूर जिल्ह्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर मुलींच्या गटांमध्ये सांगली महानगरपालिका गट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटातून कोल्हापूर ,सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे संघ सहभागी झाले होते.
या व्हाॅलीबॉल स्पर्धेला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी पाटचे उपाध्यक्ष डी.ए. सामंत यांच्या हस्ते दीपकभाई केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, उभादांडा सरपंच निलेश चमणकर ,संस्था पदाधिकारी देवदत्त साळगांवकर ,राजेश सामंत, प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे , पर्यवेक्षक राजन हंजनकर, माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाळकृष्ण रावण, सांगली जिल्हा क्रीडाधिकारी जमीर अत्तार, कोल्हापूर व्हाॅलीबॉल प्रमुख संदीप पाटील, महसूल सेवेत कार्यरत असलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी रवींद्र भालचंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संघ अध्यक्ष अजय शिंदे, तालुका क्रीडाधिकारी विजय शिंदे , राष्ट्रीय खेळाडू अतुल सावडावकर, राघोजी परब, प्रशालेचे सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
19 वर्षाखालील मुलांचे व मुलींचे रोमहर्षक सामने क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये सांगली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक,कोल्हापूर महानगरपालिकेने तृतीय तर सातारा जिल्ह्याने चौथा क्रमांक मिळविला.मुलींच्या गटांमध्ये सांगली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला.रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांक मिळविला. तर सातारा जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकाविला.
सर्व यशस्वी संघाना, पंचाना, मान्यवरांना, संस्थेतर्फे सन्मानचिन्ह आणि चषक देऊन गौरविण्यात आले. यानिमित्ताने राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय खेळाडूंचे रोमहर्षक आणि चुरशीचे सामने पाहण्याची संधी पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि क्रीडा रसिकांना मिळाली . स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गणेश चतुर्थीची सर्व शाळांना सुट्टी असताना पाट हायस्कूल स्टाफने व माजी विद्यार्थ्यांनी उत्तम सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंचक्रोशीतील विविध दात्यांचे सहकार्य मिळाले .स्पर्धेचे पंच अजय शिंदे,अमित हर्डीकर, अजित जगदाळे, हरेश वाघाटे, नेव्हील गोन्सालवीस, महेश शेडबाळे,सुरज पवार, श्रीकांत पाटील, ईर्शाद शेख ,राजेश गोवेकर, सुशांत खोत, श्रीनाथ फणसेकर, अतुल सावडावकर, जमीर अत्तार, आसिफ मुल्ला यांनी काम पाहिले.या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप साळसकर यांनी केले.