मालवण -:
उपोषणकर्त्या पारंपरिक मच्छीमारांची प्रकृती खालावल्याने संतप्त झालेल्या अन्य मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर पडु न देण्याचा इशारा सायंकाळी दिला. त्यामुळे वातावरण तंग बनले होते. जोपर्यंत अवैध पर्ससीन नौकांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा पारंपरिक मच्छीमारांनी घेतला होता.