शैक्षणिक अन् सार्वजनिक कंटेंटसाठी सरकारकडून वापर शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाइलवर कुठल्याही डाटा कनेक्शनशिवाय टीव्ही चॅलेन्सचे थेट प्रसारण करण्याच्या शक्यतेवर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. डायरेक्ट टू होम म्हणजेच डीटीएचच्या धर्तीवर डी2एम (डायरेक्ट टू मोबाइल) विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाइलवर टीव्ही चॅलेन्स पाहता येणार आहेत. केबल अन् डीटीएच कनेक्शनप्रमाणेच ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच आयआयटी खडगपूरकडून यासंबंधी कार्य केले जात आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला दूरसंचार कंपन्यांकडून मोठा विरोध होण्याची दाट शक्यता आहे. अशाप्रकारच्या सुविधेमुळे दूरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नाला मोठी झळ पोहोचू शकते. दूरसंचार कंपन्यांना सद्यकाळात मोठे उत्पन्न व्हिडिओ कन्ज्मप्शनद्वारेच प्राप्त होत असते.
डी2एम तंत्रज्ञानाच्या व्यवहार्यतेबद्दल आम्ही विचारविनिमय करत आहोत. यासंबंधी अंतिम निर्णय संबंधित घटकांशी चर्चा केल्यावरच घेतला जाणार आहे. याप्रकरणी दूरसंचार कंपन्यांनाही विश्वासात घेतले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. डी2एम संबंधी चालू आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते.
ब्रॉडकास्ट आणि ब्रॉडब्रँडद्वारे कंटेंट प्रसारित करताना त्यात एककेंद्राभिमुखता असावी असा पेंद्र सरकारचा विचार आहे. 5जी सेवेच्या प्रारंभानंतर याची मोठी आवश्यकता निर्माण झाली असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
डायरेक्ट टू फोन (डाटा कनेक्शनशिवाय)
टीव्ही चॅलेन्स अन् अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्टफोनचा वापर शक्य
ब्रॉडकास्टर्सद्वारे ब्रॉडबँड प्रदान होण्याची शक्यता
कंजेस्टेड मोबाइल नेटवर्कपासू दिलासा मिळवून देणारी व्यवस्था