नवी दिल्ली
केंद्र सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति टनामागे सरकारने 3500 रुपये इतका दर निश्चित केला आहे. याआधी हाच दर प्रति टनामागे 4400 रुपये इतका होता. मात्र, डिझेलवरील निर्यात शुल्कामध्ये 0.50 प्रति लिटरवरुन 1 रुपये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युल (एटीएफ इंधन) जे विमानांसाठी लागते हे मात्र निर्यात शुल्कामधून वगळण्यात आले आहे.