वृत्तसंस्था /कौलालंपूर
येत्या ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये एसीसी महिलांची टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार असून या स्पर्धेसाठी दोन संघ पात्र ठरावयाचे आहेत.
एसीसीच्या महिलांच्या टी-20 पात्र फेरीच्या स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग आहे. संयुक्त अरब अमिरात, मलेशिया, ओमान, कतार, नेपाळ, हाँगकाँग, कुवेत, बहरीन, सिंगापूर आणि भूतान यांचा समावेश असून ही स्पर्धा 25 जूनला संपणार आहे. या स्पर्धेतील आघाडीचे दोन संघ ऑक्टोबरमध्ये बांगलादेश येथे होणाऱया महिलांच्या टी-20 आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.