प्रतिनिधी /बेळगाव
रिसालदार गल्ली परिसरातील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नार्वेकर गल्ली, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली आणि परिसरातील डेनेजवाहिन्या तुंबल्या. याबाबत तक्रारी करण्यात आल्याने डेनेजवाहिनी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले.
रिसालदार गल्ली येथे डेनेज तुंबल्याने दुरुस्तीसाठी चरी मारण्याचे काम मागील आठवडय़ात हाती घेण्यात आले होते. मात्र ड्रेनेजवाहिन्या आणि जेसीबी उपलब्ध नसल्याने हे काम थांबले होते. पण सोमवारपासून या कामास प्रारंभ करण्यात आला. गणाचारी गल्ली कॉर्नर ते महापालिकेच्या जुन्या कार्यालयापर्यंतच्या ड्रेनेजवाहिन्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर परिसर वर्दळीचा असल्याने दुरुस्तीचे काम एका दिवसात पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मंगळवारी मार्केट बंदमुळे डेनेजवाहिनींच्या दुरुस्तीचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले. हे काम करण्यासाठी जेसीबीने रस्ता खोदाई करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता.