बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर विभाग पोलिसांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख यांसह सीपीआय, सीआयडी या अधिकाऱ्यांना यावेळी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सुवर्णसौध येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये 350 हून अधिक अधिकारी उपस्थित होते. निवडणूक ही अत्यंत पारदर्शकपणे पार पडली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वांनी काम केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा कसूर राहता कामा नये. काम करताना कोणकोणती काळजी घ्यायची याची माहिती यावेळी पोलिसांना देण्यात आली. सदर कार्यशाळा उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक, बेळगाव पोलीस आयुक्त, सीआयडी विभागाचे कायदेतज्ञ महेश व्ही. वैद्य यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचबरोबर पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., बी. आर. नेमगौडा, पी. व्ही. स्नेहा, वेणुगोपाल व इतर अधिकाऱ्यांनीही पोलिसांना काही सूचना केल्या आहेत.
Previous Articleनादुरुस्त बस गाड्यांमुळे प्रवासी हैराण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.