वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमनापद भारत भूषविणार आहे. सदर माहिती विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.
2008 नंतर पहिल्यांदाच विश्व बॅडमिंटन फेडरेशनची विश्व बॅडमिंटन स्पर्धा भरविण्याची संधी भारताला मिळाली आहे. 2008 सालातील विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा पुणे येथे घेण्यात आली होती. 2024 च्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक सामने खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धा गुवाहाटीच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संकुलात घेतली जाईल.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2026 च्या थॉमस आणि उबेर चषक फायनल्स स्पर्धेचे यजमानपद डेन्मार्क भूषविणार आहे. 2021 साली डेन्मार्कमध्ये पहिल्यांदा जागतिक दर्जाची पुरुष आणि महिलांची सांघिक बॅडमिंटन स्पर्धा घेतली गेली होती. 28 एप्रिल रोजी झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कार्यकरणी समितीच्या बैठकीमध्ये आगामी स्पर्धांच्या यजमानांची घोषणा करण्यात आली.