जिनिव्हा येथे 12 जूनपासून आयोजन
नवी दिल्ली
जागतिक व्यापारी संघटना (डब्ल्यूटीओ) यांची 12 वी मंत्री स्तरीय परिषद येत्या जून महिन्यात 12 ते 15 तारखेदरम्यान जिनिव्हा या ठिकाणी होणार असल्याची माहिती आहे.
या अगोदर सदरची बैठक ही मागील वर्षी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत होणार होती. पण तेव्हा युरोपमधील काही देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन विषाणूने आपला प्रसार वाढवला होता. या कारणास्तव या परिषदेला स्थगिती देण्यात आली होती.
डब्ल्यूटीओच्या माहितीनुसार संघटनेचे महासंचालक नगोजी ओकोंजो इवेला आणि 12 व्या मंत्री परिषदेचे अध्यक्ष कजाकस्तान तिमूर सुलेमनोव यांनी सदस्यांना नवीन तारीख जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. हे संमेलन जिनिव्हा येथील डब्ल्यूटीओ मुख्यालयात 12 ते 15 जून दरम्यान
होणार असल्याची माहिती दिली आहे.