बेळगाव : संतीबस्तवाड येथे दुर्गा देवी आणि बसवेश्वर यात्रेनिमित्त बुधवार दि. 12 रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन श्री हनुमान कुस्ती आखाडा, दुर्गा मंदिर शेजारी करण्यात आले आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाचा निर्मलसिंग पानिपत यांच्यात लढत होणार आहे. निर्मलसिंग हा प्रथमच बेळगाव जिल्ह्यात कुस्तीसाठी मैदानात उतरत आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन अमित शर्मा व कोल्हापूरचा ओमकार भातमारे (गंगावेश), तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कार्वे (कंग्राळी) व विशाल शेळके (सांगली), चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी मल्लेश व महाराष्ट्र चॅम्पियन गणेश (सांगली), पाचव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत इंगळगी (घटप्रभा) व प्रेम (कंग्राळी), सहाव्या क्रमांकाची कुस्ती पवन चिक्कदिनकोप (भांदुरगल्ली) व पृथ्वीराज पाटील (कंग्राळी), सातव्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी (दर्गा) व सुशांत पाटील (कंग्राळी), आठव्या क्रमांकाची कुस्ती रवी केप्पन्नावर (दर्गा) व कर्नाटक कुमार रोहण गौड, नवव्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगाव व संकल्प जाधव (कंग्राळी), दहाव्या क्रमांकाची कुस्ती संतोष हरुगेरी व राजू गंदीगवाड (भांदुरगल्ली) यांच्यात होणार आहे. त्याशिवाय मेंढ्यांच्या कुस्त्या महांतेश (संतीबस्तवाड) व श्रीकांत (शिंदोळी), नंदकुमार (संतीबस्तवाड) व प्रणय (उचगाव) यांच्यात होणार आहे. तर महिलांच्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राधिका (संतीबस्तवाड) व शितल (खादरवाडी), कल्याणी (वाघवडे) व स्वाती (कडोली) यांच्यात कुस्त्या होणार आहेत. याशिवाय 50 हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Previous Articleबेळगावच्या वयस्कर खेळाडूंचे यश
Next Article कणबर्गीत आज भव्य कुस्ती मैदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.