नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील कंपनी यामाहाची ‘एमटी 15 व्ही’ 2.0 ही दुचाकी सध्या चर्चेत आहे. कारण या गाडीची लोकप्रियता वाढते आहे. दररोज 307 जण ही गाडी खरेदी करत असल्याची माहिती मिळाली आहे. सदरची गाडी लाँच होताच तिला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद प्राप्त झाला आहे. एप्रिल 2022 मध्ये ही बाईक लाँच झाली होती. जिचे प्री बुकिंग मार्चमध्ये सुरू झाले होते. एक महिन्यातच 10 हजार जणांनी ही गाडी खरेदी केली आहे. यावरून या गाडीची लोकप्रियता लक्षात यावी. याचाच अर्थ दररोज 307 जणांनी ही गाडी खरेदी केल्याचे समोर आले आहे. दमदार इंजिनसह विविध वैशिष्टय़ांमुळे ही गाडी युवकांना प्रिय ठरते आहे.