मग गर्वाने दाखवितात जखमांचे व्रण
जगाच्या वेगवेगळय़ा भागात चित्रविचित्र परंपरा आजही पाळल्या जातात. एका आफ्रिकन समुदायात महिला अत्यंत वाईट प्रकारे मार सहन करतात, तरीही त्याला त्या स्वतःची शान समजतात. हॅमर समुदायाच्या लोकांदरम्यान पाळल्या जाणाऱया अजब परंपरांपैकी एक परंपरा उकुली तुला आहे. या परंपरेच्या अंतर्गत विवाहाच्s वय झाल्यावर मुलामुलींना याचा पुरावा द्यावा लागतो. पुरुषांना गाय आणि बैलाच्या शरीराला उडी घेत ओलांडून दाखवावे लागते. तर महिलांना मारहाण केली जाते. प्राण्यांचे शरीर ओलांडण्यास अपयशी ठरल्यावर मुलांचा विवाह होऊ शकत नाही, त्याचप्रकारे चाबकाचे फटके खाल्यावर महिलांना वेदनेपोटी ओरडता येत नाही.
विवाहासाठी ज्या मुलींना पाचारण करण्यात येते, त्यांना मार देण्यासाठी एक सजविलेला समूह येतो, त्याला माजा म्हटले जाते. माजा समूह तेथे उपस्थित मुलींना चाबूक आणि काठय़ांनी मारू लागतात. यादरम्यान वेदनेने ओरडण्याची किंवा पळून जाण्याची अनुमती नसते. या मारहाणीला महिला आणि पुरुषामधील प्रेमाशी जोडून पाहिले जाते. अशा स्थितीत महिला हा मार सहन करतात. ज्या मुलींना मार मिळत नाही, त्या मार खाण्यासाठी याचना करत असतात. या पूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक मार सहन करणाऱया महिलेचा विवाह सर्वात तरुण युवकाशी लावून दिला जात असतो.
विवाहानंतरही सुरू राहते मारहाण
हा मार सहन केल्यावर जीवन सुखात जगता येते असे नाही. जोपर्यंत महिला 2 मुलांना जन्म देत नाही, तोवर परंपरेच्या नावाखाली हाडं मोडून काढणारी मारहाण सुरू राहते. आश्चर्याची बाब म्हणजे कुठलेही कारण न सांगता पुरुष पत्नीला मारत असतो आणि त्या काहीच बोलत नाहीत. त्यांच्या पाठीवरील मारहाणीचे व्रण त्यांच्यासाठी शान असतात. या व्रणांना त्या सुंदर आणि प्रेमाची खुण मानतात. या समुदायात पुरुषांना दुसऱया विवाहाचीही अनुमती असते आणि तेथेही हीच प्रक्रिया राबविली जाते. याचमुळे हॅमर समुदायाच्या महिलांना सर्वात मजबूत मानले जाते.