मारूती मंदीर परिसरातील घटना;तिघा जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील मारूती मंदीर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे न दिल्याच्या रागातून तरूणावर ब्लेड व कोयत्याने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल़ी ज्ञानेश्र्वर बाबुराव लव्हारे (26, ऱा पुणे उत्तमनगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. यापकरणी शहर पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
शरद तातोबा नार्वेकर, अन्वर अली गोलंदाज व सुनील वसंतराव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्र्वर लव्हारे हे बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मारूती मंदीर परिसरातील हॉटेल शुभम येथे जेवण पार्सल नेण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी यांनी त्यांना जवेणाचे 6 हजार रूपये बील पे करण्यास सांगितल़े याला ज्ञानेश्र्वर लव्हारे यांनी नकार दिला.
लव्हारे यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपी यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. यातून लव्हारे व आरोपीत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्याच्यात हाणामारीला सुरूवात झाली. यावेळी आरोपीत यांनी लाथा-बुक्क्यांनी लव्हारे यांना मारहाण केली. तसेच आरोपी यांनी आपल्याजवळील धारधार ब्लेड व कायत्याने लव्हारे यांच्यावर सपासप वार केले. लव्हारे यांच्यावर वार होताच रक्ताच्या चिळकांड्या आरोपीत यांच्या अंगावर उडाल्या.
या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्र्वर लव्हारे यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.लव्हारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 3 संशयितांविरूद्ध भादंवि कलम 324,323,504 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला. यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.