ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु
प्रतिनिधी /बेळगाव
अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखीचा गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
5 ऑक्टोबर रोजी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुत्यानट्टी क्रॉसजवळ बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱया अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सुमारे 58 वषीय अनोळखी गंभीर जखमी झाला होता. त्याच दिवशी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.
काकती येथील चन्नप्पा पुराणिकमठ (वय 50) यांनी या संबंधी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 279, 304(ए) व 134 सहकलम 187 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 5.1 फूट उंची, अंगाने सडपातळ, गहू वर्ण असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर पांढरा शर्ट व निळी चड्डी परिधान केली होती. वरील वर्णनाच्या अनोळखी विषयी कोणाला माहिती असल्यास काकती पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.