प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिरकरवाडा येथील दर्वे यांच्या बोटीला जयगड समुद्रात तब्बल 3 टन घोळ मासा मिळाला होता. समुद्रामध्ये सोडलेली डोल ओढत असताना जाळे फाटल्याने घोळ मासा बाहेर पडल़ा सुमारे एक कोटींची ‘सोन के दिल वाली मछली’ म्हणून ओळखली जाणारी घोळ मासळी जाळ्यात सापडली होती. मात्र ऐनवेळी जाळी फाटल्याने हातात केवळ 65 नग शिल्लक राहिले.
मिरकरवाडा येथील दर्वे यांची नौका पहाटे मासेमारीसाठी गेल़ी सकाळी लवकर समुद्रामध्ये डोल सोडण्यात आल़ी या डोलीला मोठय़ा प्रमाणात घोळ मासा लागल़ा सुमारे 3 टन घोळ जाळ्यात सापडली होती. याचा व्हिडोओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल़ा मात्र क्षमतेपेक्षा अधिक मासळी जाळ्यात आल्याने जाळे पाटले व घोळ मासा जाळ्यातून बाहेर पडून गेल्यामुळे केवळ 40 किलो घोळ हाती मिळाल़ा हा मासा प्रतिकिलो 1 हजार 650 रुपयांनी विकला गेल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े
घोळ मासा स्वादिष्टही असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्व आह़े यामध्ये कोलेजन मोठय़ा प्रमाणात असल्याने अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जात़ो त्यासाठी या माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात खूप मोठी मागणी असत़े याच गोष्टींमुळे या माशाला ‘सोन के दिल वाली मछली’ म्हणून ओळखले जात़े या माशाचे सिंगापूर, मलेशिया, हाँगकॉग व चीन या ठिकाणी निर्यात केला जात़ो या जातीच्या लहान माशाची किंमतही 8 ते 10 हजार रुपये असत़े