अहमदाबाद \ ऑनलाईन टीम
ओडिशामधल्या पुरी येथे दरवर्षी जगन्नाथ यात्रा भरवली जाते. आजपासून या रथयात्रेला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत मर्यादित स्वरुपात ही रथयात्रा भरवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात हजेरी लावत तिथे पूजा केली. याचे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमित शहा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जगन्नाथ रथयात्रेच्या मंगल मुहुर्तावर मी अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात होणाऱ्या आरतीमध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे. प्रत्येकवेळी इथे आलं की एक वेगळीच उर्जा मिळते. आजही महाप्रभूंची आराधना करण्याचं सौभाग्य लाभलं. महाप्रभू जगन्नाथ सर्वांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवो ही प्रार्थना!, असे म्हणत त्यांनी काही आरती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
गेल्या वर्षीही कोरोना नियमांचं पालन करुनच ही यात्रा भरवण्यात आली होती. न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे आणि संपूर्ण राज्यात रथयात्रा काढण्यावर बंदी घातली आहे.