एआरआयआयए मानांकन प्रसिद्ध : खासगी संस्थेत कलिंग इन्स्टीटय़ूट अव्वलस्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी अटल रँकिंग ऑफ इन्स्टीटय़ूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) 2020 प्रसिद्ध केले आहे. अटल मानांकन 2020 मध्ये यंदा इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासने पुन्हा एकदा केंद्रीय अनुदानप्राप्त संस्थेच्या शेणीत अव्वल स्थान पटकाविले आहे. तर खासगी संस्थेच्या शेणीत कलिंग इन्स्टीटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (केआयआयटी) ओडिशा अग्रस्थानी राहिले आहे.
कोरोना महामारी पाहता यंदा मानांकनाची घोषणा ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्यात आली आहे. तर एआरआयआयए 2020 मानांकनात पहिल्यांदाच महिलांच्या उच्च शिक्षण संस्थांसाठी एक विशेष पुरस्कार शेणी सामील करण्यात आली आहे.
शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार
एआरआयआयए हा शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार आहे. एआयसीटीई आणि मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाकडून त्यावर अंमलबजावणी केली जाते. भारतातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना नवोन्मेष, उद्योजकता, स्टार्टअप आणि विकासाच्या आधारावर मानांकन प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. या मानांकनात एकूण 674 संस्थांनी भाग घेतला आहे.
उपराष्ट्रपतींकडून कौतुक
एआरआयआयएचे कौतुक करत उपराष्ट्रपती नायडू यांनी नवोन्मेष मानवी प्रगतीचा महत्त्वाचा पैलू असल्याचे म्हटले आहे. नवोन्मेष फलदायी व्हावा याकरता शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात या पैलूवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे नायडू म्हणाले.
केंद्रीय अनुदानप्राप्त संस्था श्रेणी
? आयआयटी मद्रास
? आयआयटी मुंबई
? आयआयटी दिल्ली
? आयआयएससी बेंगळूर
? आयआयटी खडगपूर
? आयआयटी कानपूर
? आयआयटी मंडी
? आयआयटी कालिकत
? आयआयटी रुडकी
?युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद
महिलाविशेष शैक्षणिक संस्था शेणी
? अविनाशिलिंगम इन्स्टीटय़ूट फॉर होम सायन्स इन हायर एज्युकेशन
? इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेन
खासगी शैक्षणिक
संस्था शेणी
? एसआर इंजिनियरिंग कॉलेज, तेलंगणा
? जीएच रईसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, नागपूर
? श्रीकृष्ण कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी
? एनआयटी मीनाक्षी इन्स्टिय़टय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
? सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी
खासगी/अभिमत विद्यापीठ श्रेणी
? कलिंगा इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, ओडिशा
? एसआरएम इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी
? वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
? अमृता विश्वा विद्यापीठम्
? सत्यभामा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी
राज्याचे अनुदानप्राप्त स्वायत्त संस्था शेणी
? इन्स्टिटय़ूशन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे
? पीईएस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कर्नाकट
?
कोइम्बतूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू
? श्री गुरुजी गोविंद सिंहजी इन्स्टिटय़ूट ऑफ आयटी, महाराष्ट्र
? पीएसजीआर कृष्णम्मल कॉलेज फॅर विमेन, तामिळनाडू
राज्याचे अनुदानप्राप्त विद्यापीठ श्रेणी
? इन्स्टीटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र
? पंजाब विद्यापीठ
? चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ
? आनंद कृषी विद्यापीठ
? पेरियार विद्यापीठ
? नेताजी सुभाषचंद्र इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी