भाजप वैद्यकीय आघाडीचे पोवईनाक्यावर आंदोलन
प्रतिनिधी/ सातारा
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सर्कल,पोवई नाका याठिकाणी खा. संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल काढलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.
यावेळी सर्वांनी संजय राऊत आणि त्यांना पाठीशी घालणारे तिघाडी सरकार यांचा निषेध करणारे फलक हातात घेतले होते. संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यासाठीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यामार्फत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांना पाठवले.
यावेळी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा संयोजक डॉ. उत्कर्ष रेपाळ, सातारा शहर संयोजक डॉ. वीरेंद्र घडय़ाळे, सहसंयोजक डॉ. श्री अभिराम पेंढारकर, सहसंयोजक डॉ अजिंक्य पवार, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन साळुंखे, सातारा शहर उपाध्यक्ष डॉ. अजय साठय़े, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहर अध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस प्रविण शहाणे ,जयदीप ठुसे ,विक्रांत भोसले, गणेश पालखे ,जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, सुनील जाधव,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, सातारा शहराध्यक्ष संदीप वायदंडे, आरोग्य सेवा आघाडी जिल्हा संयोजक विवेक कदम, युवा मोर्चा सातारा अध्यक्ष विक्रम बोराटे ,उद्योग आघाडी सातारा जिल्हा संयोजक निलेश शहा ,उद्योग आघाडी शहर संयोजक रोहित साने, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे उपस्थित होते.