माझा धर्म पशु बचाव दलाच्या सदस्यांचा पुढाकार : काकती पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्राच्या कर्मचाऱयांकडून औषधोपचार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे बेळगावमध्येच अडकून पडलेल्या उंटांच्या तांडय़ातील एक उंट आजारी पडल्याने माझा धर्म बचाव दलाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या उंटावर उपचार केले. यासाठी त्यांना काकती पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्राचे सहकार्य लाभले.
राजस्थानमधून उंट घेऊन मध्यप्रदेश येथील काही तरुण बेळगावला लॉकडाऊनपूर्वी दाखल झाले. त्यावेळी उंटावरून मुलांचे मनोरंजन करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. परंतु अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांची आर्थिक आवक थांबली. परराज्यात जाण्यास बंदी असल्याने व हाती पैसे नसल्याने या तांडय़ातील लोकांना गावाकडे जाणेही कठीण झाले आहे.
या तांडय़ामध्ये आठ उंटांचा सांभाळ तरुण करत आहेत. हिंडाल्कोनजीकच्या पुलाखाली त्यांचे वास्तव्य आहे. उंटांना पुरेसे अन्नही मिळेनासे झाले आहे. सध्या या तांडय़ाच्या मालकांना सामाजिक संघटना, भोजन आणि रेशन पुरवठा करत आहेत. हे तरुण सकाळी आसपासच्या परिसरात फिरून उंटांसाठी चारा गोळा करत आहेत.
दरम्यान त्यातीलच एक उंट आजारी झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करणे भाग होते. ही माहिती माझा धर्म पशु बचाव दलाचे विनायक केसरकर यांना समजली. त्यांनी तातडीने बचाव दलातील सदस्य कलामुद्दीन शाह यांना उंटाची स्थिती पाहण्यास पाठविले. सदर उंटाच्या नाकानजीक कीड लागली असून त्याचा परिणाम उंटाच्या शरीरावर होऊन तो अत्यवस्थ होत असल्याचे लक्षात आले. कलामुद्दीन यांनी त्वरित काकती पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्राशी संपर्क साधला आणि तेथील कर्मचाऱयांनी येवून उंटावर उपचार केले.
विनायक केसरकर हे प्राणी-पशु बचाव कार्यात आघाडीवर असून भटक्मया समाजाकडे असणाऱया प्राण्यांसाठी ते काम करतात. भटक्मया समाजातील सर्वांकडे त्यांनी आपला फोन क्रमांक दिला आहे. त्यामुळेच उंट चालकांना विनायक यांच्याशी संपर्क साधणे शक्मय झाले व उंटाला वेळीच उपचार मिळाले.
लॉकडाऊन संपताच आम्ही आमच्या गावी परतणार…
बेळगावमध्ये उंट आणि चालक अडकून पडल्याचे सविस्तर वृत्त ‘तरुण भारत’ने दिले होते. त्यांच्या तांडय़ातील चालकांची मुलाखत घेऊन त्यांच्या व्यथा तरुण भारतने मांडल्याने अनेकांनी त्यांना मदत केली. लॉकडाऊन संपताच आम्ही आमच्या गावी परतणार आहोत. परंतु त्यासाठी वाहन खर्च करण्याची आमची ऐपत नाही, असे तांडय़ातील गोलू या उंट चालकाने सांगितले.