सावंतवाडी /प्रतिनिधी-
पालकमंत्री सामंत साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही अग्निशामक केंद्राचा प्रस्ताव साडेतीन कोटीचा पाठवला आहे. आता तुम्ही तो मंजूर करा आणि निधी द्या आणि तुमचा शब्द पाळा. गेली पंचवीस वर्ष जुना अग्निशामक बंब पूर्वीचे सत्ताधारी वापरत होते. आता नवीन अग्निशामक बंबासाठी 77 लाखाचा आम्ही प्रस्ताव तयार केला आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नासीर शेख उपस्थित होते. सावंतवाडी शहरात लसीकरणसाठी लस उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.