सावंतवाडी/ प्रतिनिधी-
वी फाॅर यू संस्था आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहे. मात्र ही संस्था आपले पर्यावरणाचा समतोल राखण्याविषयी असलेले कर्तव्य विसरलेली नाही. आज झाडे लावणे व ती जगवणे ही काळाची गरज आहे आणि याच उद्देशाने यावर्षी अनोखा वनमहोत्सव साजरा करण्याचे संस्थेने ठरविले आहे. यामध्ये ऑक्सिजन देणारी झाडे घरपोच विनामूल्य देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे वृक्षारोपण कार्यक्रम करता येणार नसल्यामुळे नवीन अनोख्या पद्धतीने वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.रोपे हवी असल्यास किंवा
अधिक माहितीसाठी +91 89754 10854 ( ॲड. संकेत नेवगी) +91 97642 26368 ( ॲड. दत्तप्रसाद नाटेकर)या क्रमांकावर संपर्क करावा,असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाची सांगता 11 जुलै रोजी वेंगुर्ला येथे “वी फाॅर यू”संस्था व “वेंगुर्ला नगरपरिषद” यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. या आधी देखील “वी फाॅर यू” संस्थेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत