7 ते 11 जूनदरम्यान ऑनलाइन स्वरूपात होणार परिषद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकन कंपनी ऍपलने आपल्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (डब्ल्यूडब्ल्यूडीसी) 2021 ची नुकतीच घोषणा केली आहे. मात्र सदरची परिषद ही ऑनलाईन स्वरुपात सादर होणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट करण्यात आलेले आहे. सदरचा कार्यक्रम हा 7 ते 11 जूनपर्यंत होणार असल्याचे ऍपलने स्पष्ट केले आहे.
आम्ही सर्वजण डब्ल्यूडब्ल्यूडीसी 21 चा कार्यक्रम हा बेस्ट इव्हेन्ट म्हणून साजरा करणार असून त्यावर काम करीत असल्याचे वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्सच्या उपाध्यक्षा सुसान प्रसकोट यांनी सांगितले असून डेव्हलपर्स न्यूजटूलसह काहीसे उत्साहित असल्याचेही समजते.
डब्ल्यूडब्ल्यूडीसीमधून काय अपेक्षा?
कंपनी प्रतिवर्षी कॉन्फरन्सच्या दरम्यान ऍपल आयओएस, आयपॅडओएस, मॅकओएस, वॉचओएस आणि टीव्हीओएस यांचे नवीन व्हर्जन सादर करत असते. यावेळी कंपनीने अपडेट आयओएस 15 सह दुसऱया उत्पादनांचे सादरीकरण करण्याचे संकेत आहेत. कंपनीची परिषद संपूर्णपणे ऑनेलाइन स्वरुपाची आहे.
ऍपल ग्लासचे डिझाइन ऍपलच्या टीजरमध्ये ग्लास आणि मॅकबुक दिसत आहे. यामध्ये लाँचिंगशी संबंधीत माहिती समोर आली आहे.