डब्लिन/ वृत्तसंस्था
आयर्लंड पुरूष क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी 29 वर्षीय पॉल स्टर्लिंगची नियुक्ती केली आहे. 2008 साली स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले आहे.
स्टर्लिंगने आतापर्यंत 282 सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले असून तो आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासामध्ये राष्ट्रीय संघाचे सर्वाधिक सामन्यांत प्रतिनिधीत्व करणारा तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. स्टर्लिंगने क्रिकेटच्या विविध प्रकारात फलंदाजीत 8,821 धावा जमविल्या असून त्याने गोलंदाजीत 101 बळी घेतले आहेत. आयर्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजामध्ये स्टर्लिंग दुसऱया स्थानावर आहे. गेल्या आठवडय़ापासून आयर्लंडच्या क्रिकेट संघाने आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे.