- निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस
ऑनलाईन टीम / जोधपूर :
अभिनेता बॉबी देओल आणि निर्माता प्रकाश झा यांची चर्चित वेब सिरीज आश्रम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
दरम्यान, आश्रम ही वर्षातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजपैकी एक म्हणून गाजली होती. अलिकडेच या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. या सीझनवर देखील प्रेक्षक आणि समिक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला.
जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या सीरिजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप त्यांनी केला.शिवाय या सीरिजवर बंदी घालण्यासाठी त्यांनी जोधपूर सत्र न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.