आष्टा / वार्ताहर
आष्टा येथे महिलेच्या गळ्यातील साडे पाच तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. आष्टा पोलिसांनी कसून तपास करीत संशयित चोरांना ताब्यात घेत संबंधित महिलेला साडे पाच तोळ्याचे गंठण परत मिळवून दिले. आष्टा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक २८/८/२०२१ रोजी आष्टा चव्हाणवाडी येथे सौ. सरोजिनी लवटे याचे गळयातील साडे पाच तोळयाचे गंठण खेचुन जबरी चोरी करुन चोरुन नेल्याबाबत आष्टा पोलीस ठाणे नंबर ३५४/२०२१ भादवीसं कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामध्ये आष्टा पोलीस ठाणेकडील अधिकारी व तपास पथक यांनी तांत्रिक मदतीने व गोपनिय माहितीव्दारे कसोशिने तपास करुन आरोपी रसुल ऊर्फ रसुली सरताज इराणी व वैभव चंद्रकांत सातव दोन्ही राहणार जयसिंगपुर जि. कोल्हापुर यांना सदर गुन्हया प्रकरणी सापळा लावुन ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरी केलेले साडेपाच तोळे दागिने हस्तगत करण्यात आले होते.
न्यायालयाचे आदेशाप्रमाणे यातील फिर्यादी सौ सरोजिनी लवटे यांना दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी साडेपाच तोळे सोन्याचे दागिने परत देण्यात आले. सदरची कामगिरी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, सपोनि आण्णासाहेब बाबर, पो.हे.कॉ अभिजित धनगर, पोलीस नाईक नितीन पाटील,अमोल शिंदे, कॉन्स्टेबल सुरज थोरात, अभिजित नायकवडी यांनी ही कामगिरी केली व जबरी चोरीतील फिर्यादीना सोन्याचे साडेपाच तोळे दागिने परत देण्यात आले आहेत.