वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
महिला जलद गोलंदाज एमिली अर्लोटला भारताविरुद्ध होणाऱया एकमेव कसोटीसाठी इंग्लंड महिला संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. 16 जूनपासून ही कसोटी सुरू होणार आहे.
या कसोटीसाठी इंग्लंडने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात नंतर कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंना आरएचएफटी करंडक स्पर्धेत खेळता येणार आहे. अर्लोटने अलीकडेच या स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवली होती. याशिवाय नॅट स्किव्हर ही इंग्लंड महिला संघाच्या तीनही फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदी राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. भारत व इंग्लंड महिला संघांत सात वर्षांनंतर पहिली कसोटी होत असून हीदर नाईट इंग्लंड संघाची कर्णधार असेल. या कसोटीनंतर 3 वनडे व 3 टी-20 सामनेही या संघांत होणार आहेत.
इंग्लंड महिला कसोटी संघ ः हीदर नाईट (कर्णधार), एमिली अर्लोट, टॅमी ब्युमाँट, कॅथेरिन ब्रंट, केट क्रॉस, प्रेया डेव्हिस, सोफिया डंकली, सोफी एक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, टॅश फारांट, सारा ग्लेन, ऍमी जोन्स, नॅट स्किव्हर (उपकर्णधार), अनया श्रबसोल, मॅडी व्हिलियर्स, फ्रान्स विल्सन, लॉरेन विनफील्ड हिल.