नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि.(ईईएसएल)ने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयासोबत मिळून येत्या 2024 पर्यंत देशभरात 1.6 कोटी स्मार्ट एलईडी स्ट्रीटलाइट लावण्याचे ध्येय निश्चित केले असल्याची माहिती आहे. वीज मंत्रालयाच्या अधीन राहून ईईएसएलने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने स्ट्रीट लाईट (रस्त्यावरचे दिवे) राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हे एलईडी लावण्यात येणार आहेत. या अगोदर देशभरात जवळपास 1.2 कोटी एलईडी स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जानेवारी 2015 मध्ये देशभरात परंपरागत स्ट्रीट लाईटला स्मार्ट आणि ऊर्जा दक्ष एलईडी स्ट्रीट लाईटमध्ये बदण्यासाठी स्ट्रीट लाईट राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.