वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दक्षिण कोरियामध्ये विशेष दूताची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. बायडन यांनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्तपणे संमेलनानंतर, राजकीय आणि अन्य संदर्भातील महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी सुंग किम हे उत्तर कोरियाचे नवे अमेरिकन दूत असणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यासंदर्भात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते. चर्चेनंतरच सदरची निवड करण्यात आल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती आणि बायडेन यांनी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे.