ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मंगळवारी उत्तराखंडात 259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6587 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 3845 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 10, बागेश्र्वर 1, चमोली 2, चंपावत 5, देहरादून 33, हरिद्वार 42, नैनिताल 45, तेहरी गरवाल 13 आणि यू एस नगरमधील 108 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 6587 रुग्णांपैकी आतापर्यंत 3720 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.47 टक्के इतके आहे. तर सध्या 2759 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.