विद्यापीठात इंटर्नशीप करण्यासाठी निमंत्रित
प्रतिनिधी / बेळगाव
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) या अमेरिकेतील प्रति÷sच्या संस्थेने आयोजिलेल्या परिषदेमध्ये बेळगावच्या रोहिन लेंगडे याने सादर केलेल्या रिसर्च पेपरची उत्कृष्ट रिसर्च पेपर म्हणून निवड झाली आहे. सोसायटीच्या नियतकालिकामध्ये त्याचा रिसर्च पेपर प्रकाशित होणार आहे.
रोहिन हा सेंट पॉल्स शाळेचा विद्यार्थी असून सध्या तो जीआयटीमध्ये मेकॅनिकल विभागात शिक्षण घेत आहे. एएसएमई ही प्रति÷ित संस्था विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यरत असून अलिकडेच भारतातही संस्थेचे आगमन झाले आहे. जीआयटीमध्ये एएसएमई शाळा कार्यरत असून रोहिन त्याचा सदस्य आहे. सोसायटी आपले सर्व उपक्रम ई-मेलद्वारे सदस्यांना पाठवत असते. त्यातूनच रोहिनला पोर्टलंड येथे होणाऱया परिषदेबाबत माहिती मिळाली.
रोहिनने टोपोलॉजी ऑप्टीमायझेशन वापरुन रॉकेट इंजिन कसे डिझाईन (एरोस्पाईक) करता येते यावर संशोधनपर रिसर्च पेपर ऑनलाईन पाठविला. दोन टप्प्यात या रिसर्च पेपरची चाचणी होते.
रोहिनची या क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ गुएल्फने त्याला आपल्या विद्यापीठात इंटर्नशीप करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ही इंटर्नशीप विद्यापीठाने पुरस्कृत केली आहे. लवकरच तो कॅनडाला रवाना होणार आहे. रोहिन हा शिल्पा व शशांक लेंगडे यांचा सुपुत्र तर प्रभा व उद्योजक प्रेमचंद लेंगडे यांचा नातू आहे. विशेष म्हणजे प्रेमचंद लेंगडे हे अमेरिकेत असताना एएसएमईचे सदस्य होते.