वार्ताहर/ शिवोली
ओशेल पंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकूण 94.6 टक्के मतदान झाले. पंचायतीच्या वॉर्ड क्र. 7 साठी 317 मतदारांपैकी 300 जणांनी मतदानाचा अधिकार बाजविला. येथील सरकारी प्राथमिक शाळेत मतदान घेण्यात आले.
ओशेल पंचायतीच्या वॉर्ड कमांक सात मधून 2017 साली निवडून आलेले व उपसरपंचपदी राहिलेले सुरथ वेर्णेकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त होती. या जागेसाठी शनिवारी मतदान झाले. वॉर्ड क्र. 6 मधून विद्यमान पंचसदस्य असलेले प्रविण कोचरेकर यांनी वॉर्ड क्र. 7 मध्ये अर्ज भरुन माजी सरपंच रामा परब यांच्या बरोबर निवडणुक रिंगणात उतरलेल होते. दिवंगत सुरथ वेर्णेकर यांनी रामा परब यांचा 2017 साली पंचायत निवणुकीत पराभव केला होता. श्री. परब यांना चार वेळा सरपंच पदावर राहण्याचा मानही मिळाला होता.