कबुतरे पाळताना घ्यावी लागणार खबरदारी
सुधाकर काशीद / कोल्हापूर
कबुतरे पाळणे हा कोल्हापुरातील अनेकांचा छंद आहे…..वेगळ्या ठिकाणी असलेल्या पेटाऱयात मिळून आठ ते दहा हजार पाळीव कबुतरे कोल्हापुरात आहेत……कबुतरा वरचे प्रेम एवढे की, काहींनी लाडक्या कबुतरांच्या पायात सोने चांदीचा रिंगा घातल्या आहेत……पण काही कबुतर प्रेमींचा अतिरेक या प्रेमाच्या आड येणार आहे आणि आता कबुतरांच्या नैसर्गिक हालचालींना बाधा न येता कबुतरे पाळावी लागणार आहेत. वन विभागाने एक कारवाई करून आपल्या भविष्यातील कारवाईचे संकेत दिले आहेत.
कोल्हापुरात कबुतरे पाळण्याचा छंद जुना आहे. अनेक तालमीच्या आवारात ही कबुतरांच्या पेटÎा होत्या. पाच-पन्नास कबुतरांना या पेटÎात ठेवायचे. सकाळी-संध्याकाळी त्यांना बाहेर काढायचे. खाद्य घालायचे. पंख खुले करण्यासाठी त्यांना रोज काही काळ उडवायचे .कबुतरांच्या उडण्याच्या स्पर्धा भरवाय च्या व जे कबूतर सर्वाधिक काळ आकाशात भरारी घेत राहिल त्याच्या मालकाला बक्षीस द्यायचे असे या कबुतर पालनाचे स्वरूप आहे. उत्तरेश्वर शाहूपुरी राजारामपुरी, मोरेवाडी, घिसाड गल्ली ,उमा टॉकीज, शेळके पुल, पाडळकर मार्केट, रेस कोर्स नाका, गंगावेश ,फुलेवाडी, ऋणमुक्तेश्वर अशा ठिकाणी कबूतर शौकीन आहेत. 25, 50 पासून ते दोन तीनशे कबूतरे त्यांच्याकडे आहेत ही कबुतरे म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा घटक झाली आहेत. या कबुतरांचे संगोपण, त्यांचे दाणापाणी त्यांची स्वच्छता त्यांची हौस याचा छंद या कबूतर शौकिनांना आहे. केरळमधील काही गावे, सांगली, पुणे, मुंबई येथून कबुतरे आणायची व पाळायची पद्धत आहे आता कोईमतूर येथूनही कबुतरे आणली जाऊ लागली आहेत.
या कबुतरा पासून शौकिनांना काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट त्यांच्या संगोपनाचा मोठा खर्च आहे तरीही हे कबूतर शौकीन कबुतरे पाळतात. एखादे कबुतर मलुल दिसले की लगेच औषधोपचार करतात. हे कबूतर शौकीन वर्षातून दोनदा कबुतरांच्या उडण्याची स्पर्धा घेतात. महिनाभर ही स्पर्धा चालते. या स्पर्धेच्या प्रथेनुसार कबूतर मालकाने आपल्या घरापासूनच कबुतराला आकाशात उडवायचे असते. कबूतर त्याच परिसरात उंच गोलाकार भरारी घेत असते ते न थकता किती वेळ आकाशात भरारी मारत राहते. आणि जेथून त्याला आकाशात उडवले त्याच ठिकाणी ते कसे उतरते याचे निरीक्षण खाली थांबलेल्या पंचाकडून तासातासाला केली जाते. या पंचाचे निरीक्षण एवढे तीक्ष्ण असते की ते उंच आकाशात उडणारे स्पर्धेतले कबूतर बरोबर हेरतात व त्याची नोंद ठेवतात. कोल्हापुरात सलग आठ ते नऊ तासाहून अधिक काळ एक कबूतर उडत राहिले अशी स्पर्धेतली नोंद आहे.
पण कबुतरांना असे स्पर्धेच्या निमित्ताने सतत उडत राहायला लावणे हा पक्षी प्राणी यांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा आहे असे काहींचे मत आहे. त्यांना छोटÎा-छोटÎा पे पेटाऱयात कोंडून ठेवणे, त्यांची झुंज लावणे यावरही अनेकांचे आक्षेप आहेत. याशिवाय या कबुतरांच्या मुळे होणारी घाण देखील तक्रारीचा मुद्दा आहे. त्यामुळे वन विभागाने पहिली कारवाई केली आहे. वीस कबुतरे जप्त केली आहेत. आता अशीच कारवाई इतरांवरही होण्याची शक्यता आहे.
वन अधिकाऱ्यांची परवानगी घेणार
कबुतरे आमच्या कुटुंबाचाच घटक झाली आहेत. घरातल्या लहान मुलांना जसे जपले जाते तसे आम्ही कबुतरांना जपतो. त्याच्याशी जे क्रूरतेने वागत असतील तो त्या त्या वेळच्या कारवाईचा भाग आहे. पण आम्ही सर्व कबूतर शौकीन वन खात्याच्या अटी पाळून, परवानगी घेऊनच कबुतरे पाळणार आहोत. त्यासाठी अधिकायांची लवकरच भेट घेणार आहोत.
– नितीन यशवंत खाडे कबूतर शौकीन उत्तरेश्वर पेठ.
सोन्या,चांदीची कडी
आपल्या लाडक्या कबुतरांची कबूतर शौकीन खूप हौस करतात. त्यांच्या पायात सोन्या-चांदीची लहान कडी घालतात. काहीजण त्यांना धान्या बरोबरच गूळ बदामासारखे महाग खाद्यही घालतात.